• news.cision.com/
  • Storytel/
  • स्टोरीटेलचे `माया महा ठगनी’ नवीन ऑडिओ बुक मराठी अभिनेत्री लीना भागवत यांच्या आवाजात सादर

स्टोरीटेलचे `माया महा ठगनी’ नवीन ऑडिओ बुक मराठी अभिनेत्री लीना भागवत यांच्या आवाजात सादर

Report this content

ऑडिओ बुकमधील नायिकेला आवाज देण्याचा लीना यांचा पहिलाच यशस्वी प्रयत्न

05 फेब्रुवारी 2019: जगभरातील पहिल्यावहिल्या ऑडिओबुक अॅप स्ट्रिमिंग सेवा देणाऱ्या स्टोरीटेल अॅपने मराठी अभिनेत्री लीना भागवत यांच्या आवाजातील नवे पुस्तक श्रोत्यांसाठी सादर केले आहे. संवेद गळेगांवकर लिखित माया महा ठगनी या ऑडिओबुकचे 2 फेब्रुवारी 2019 रोजी पुण्यात स्टोरीटेलतर्फे प्रकाशन करण्यात आले.

माया महा ठगनी हे ऑडिओबुक म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवरची एक थरारक गोष्ट आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर, गैरवापर, त्याचे सामान्य माणसाच्या आयुष्यावर होणारे परिणाम, ऑफिसमधलं पॉलिटिक्स आणि नायिकेची या सर्वांविरोधात असलेली लढाई हा या ऑडिओबुकचा मूळ गाभा आहे. नायिकेचं पात्रं अभिनेत्री लीना भागवत यांनी उभं केलं आहे. तिची लढाई आणि आणि त्यातून उलगडत जाणारी माया महा ठगनीची गोष्ट लीना यांच्या आवाजात श्रवणीय झाली आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या विषयावर मराठीत पहिल्यांदाच पुस्तक लिहिलं जात आहे. एका सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत असलेल्या संवेद गळेगांवकरांनी हे संपूर्ण नवीन विश्व अतिशय उत्तमप्रकारे आपल्यासमोर उभं केलं आहे. त्याचे अनेक पैलू सामान्य श्रोत्यांना उलगडून दाखवले आहेत.

या कथेची नायिका गायत्री माया महा ठगनी या ऑडिओबुकचं प्रमुख पात्र आहे. तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे तिच्या भावावर संकट ओढवलंय आणि साता समुद्रापलिकडे परदेशात चाललेल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या लढाईला ही नायिका सज्ज झालेली आहे. आजच्या तरूण श्रोत्यांबरोबरच सर्वच वयोगटातील श्रोत्यांना ही कथा आपलीशी वाटणार आहे.

ऑडिओबुक प्रकाशनावेळी लीना भागवत बोलत होत्या, त्या म्हणाल्या की, ``मी पहिल्यांदाच ऑडिओबुकसाठी काम केलंय. स्टोरीटेलने मला ही संधी दिली. यापुढे ऑडिओबुक्स हेच भविष्य असणार आहे. कारण नवी पिढी फारच वेगाने धावणारी आहे. त्यांच्या गतीशी जुळू शकेल असं हे माध्यम आहे. माया महा ठगनी हे पुस्तक रेकॉर्ड करणं फारच आनंददायक होतं, थरारकही होतं. आता सतत पुढे काय होणार याची उत्सुकता मला लागून राहिलेली असायची. संपूर्ण दहा भाग करणं ही माझ्यासाठी ट्रीटच होती.’

स्टोरीटेलने नवनवीन पुस्तकांबरोबर मराठीमधील अनेक क्लासिक पुस्तकांचीही ऑडिओबुक्स केली आहेत. शिवाजी सावंत लिखित मृत्यूंजय, छावा, पु. लं. देशपांडे यांची पुस्तके, दुनियादारी, बनगरवाडी या आणि अशा अनेक पुस्तकांची ऑडिओबुक्स स्टोरीटेलने उपलब्ध करून दिली आहेत. प्रादेशिक संहितांवर लक्ष केंद्रीत करून कार्यरत असलेले स्टोरीटेल हे एक अग्रणीचे अॅप आहे.

माया महा ठगनी हे नवीन ऑडिओबुक 02 फेब्रुवारी 2019 पासून स्टोरीटेलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तुम्ही 14 दिवसांच्या ट्रायलवर स्टोरीटेल अॅप डाउनलोड करू शकता.

सबस्क्राइबर्ससाठी पहिले चौदा दिवस विनामूल्य असतील. यानंतर त्यांना 299 रुपयांमध्ये मासिक सबस्क्रीप्शन घेता येणार आहे. या एका अॅपवर सबस्क्राइबर ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारे असंख्य पुस्तके ऐकू शकतात.

स्टोरीटेल अॅप गुगल प्ले स्टोअरवर http://bit.ly/2rriZaU आणि आयओएस  अॅपवर https://apple.co/2zUcGkG उपलब्ध आहे.

मीडियाच्या अधिक प्रश्नांसाठी कृपया येथे संपर्क साधा :

अंकिता वर्मा

+91 8879151992

ankita.verma@storytel.com

About Storytel

Storytel launched its service in 2005 and to date has had more than 27 million listeners of its audiobooks. Storytel works with all types of smartphones and has an offline function that allows you to listen to audiobooks even when there is no Internet connection available. Storytel's subscriber base grew more than 100% annually from 2010 to 2014 and continues to grow year after year. In August 2017, Storytel reached the top of the 500,000 subscribers. The company is headquartered in Stockholm and operates in 14 countries: Sweden, Norway, Denmark, Holland, Finland, Russia, Spain, Poland, Iceland, Bulgaria and now India.

The app works with all types of smartphones and has an offline function that allows you to listen to audiobooks even when there is no Internet connection available. Storytel's subscriber base grew more than 100% annually from 2010 to 2014 and continues to grow year after year.

Link to the website: https://www.storytel.in

Subscribe

Media

Media

Documents & Links